Shreya Maskar
उन्हाळ्यात संध्याकाळच्या नाश्त्याला चहासोबत काही चटपटीत आणि कुरकुरीत खायचे असेल तर कांदा भजी बनवा. सिंपल रेसिपी आताच नोट करा.
कांदा भजी बनवण्यासाठी कांदा, मीठ, पाणी, हळद, लाल तिखट, धणेपूड आणि बेसन इत्यादी साहित्य लागते.
कुरकुरीत स्ट्रीट स्टाइल कांदा भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम कांदा सोलून चिरून घ्या. एका बाऊलमध्ये चिरलेला कांदा आणि मीठ एकत्र करून ५-१० मिनिटे बाजूला ठेवा.
कांद्यातील सर्व पाणी निघून गेल्यावर त्या पाण्यात हळद, लाल तिखट, धणेपूड आणि बेसन घालून व्यवस्थित मिक्स करा. पाणी कमी वाटल्यास, तुम्ही थोडे अधिक पाणी घालू शकता.
आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात छोटे छोटे कांद्याचे पकोडे सोडा आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. कांद्याचे पकोडे तळताना गॅस मंद आचेवर ठेवा, जेणेकरून पकोडे जळणार नाही.
सर्व कांद्याचे भजी एका टिश्यूमध्ये काढून घ्या. ज्यामुळे सर्व तेल शोषले जाईल. कुरकुरीत कांदा भजीचा पुदिन्याच्या चटणीसोबत आस्वाद घ्या.
तुम्हाला कांदा भजी अधिक कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही बेसन पीठात १-२ चमचे तांदळाचे पीठ मिक्स करा. यामुळे भजी कुरकुरीत होतात.
पाण्याचा वापर टाळून चिरलेल्या कांद्याला मीठ लावून ५-१० मिनिटे ठेवा. तसेच भजी मध्यम आचेवर लालसर होईपर्यंत तळा.