कांदा भजी खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा फणसाची भजी, सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

पाऊसाला सुरूवात

रिमझिम पाऊस आणि गरमा गरम भजी हे समीकरण काय नवीन नाही. पावसाळ्यात भजी खाण्याची मज्जा ही काहीशी वेगळीच असते.

Monsoon | yandex

कांदा आणि बटाटा भजी

मात्र नेहमीचीच कांदा आणि बटाटा भजी खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल तर तुम्ही ही नवीन भजीची रेसिपी ट्राय करा.

Crispy Bhaji Pakoda | Yandex

फणसाची भजी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने फणसाची कुरकुरीत भजी कशी बनवायची याविषयी सांगणार आहोत.

Fansachi Bhaji

सोपी रेसिपी

फणसाची भजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. घरच्या घरी ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला कच्चा फणस, बेसन, तांदळाचे पीठ, आलं- लसूण, हिरवी मिरची, लाल मसाला, हळद, ओवा, मीठ आणि तेल हे साहित्य एकत्र करा.

Fansachi Bhaji Recipe

स्टेप १

सर्वातआधी फणसाची काटेरी साल काढून त्यातील गऱ्यांचे बारीक बारीक तुकडे करा.

Fansachi Bhaji Recipe

स्टेप २

बारीक केलेले फणसाचे तुकडे कुकरमध्ये पाणी आणि मीठ घालून २ ते ३ शिट्या देऊन मऊ शिजवून घ्या.

Jackfruit | yandex

स्टेप ३

यानंतर एका प्लेटमध्ये शिजवलेले फणसाचे तुकडे काढा आणि पाणी फेकून द्या.

Jackfruit | yandex

स्टेप ४

एका भांड्यामध्ये शिजवलेला फणस, बेसन, तांदळाचे पीठ, आलं- लसूण पेस्ट, हिरवी मिरची, लाल मसाला, हळद, ओवा आणि मीठ हे मिश्रण घालून तयार करा.

spices

स्टेप ५

संपूर्ण मसाले मिक्स केल्यानंतर हे मिश्रण भजीच्या पिठाप्रमाणे घट्ट तयार करा. मिश्रण जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.

Fansachi Bhaji Recipe

स्टेप ६

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मिश्रणाचे छोटे छोटे गोळे सोडा. सोनेरी रंग होईपर्यंत ही भजी फ्राय करा. अशाप्रकारे गरमागरम फणसाची भजी घरच्या घरी तयार होतील.

Fansachi Bhaji Recipe

NEXT: महागड्या औषधांची गरज पडणार नाही! 'हे' एक फळ हाय ब्लड प्रेशर करेल कंट्रोल, हृदयही राहील निरोगी!

Heart Healthy Fruit
येथे क्लिक करा...