Shreya Maskar
जेवणाला चटपटीत मालवण स्टाइल कांदा-बटाट्याची भाजी बनवा.
मालवणी स्टाइल कांदा-बटाट्याची भाजी बनवण्यासाठी तेल, कांदा, बटाटा, आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, गरम मसाला, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, मीठ आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
मालवणी स्टाइल कांदा-बटाट्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि हिंग घालून फोडणी द्या.
त्यानंतर यात कढीपत्ता, कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
मिश्रणात पुढे आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला टाका.
बटाट्याचे तुकडे आणि मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या.
भाजीत पाणी टाकून वाफेवर शिजवून घ्या.
मालवणी स्टाइल कांदा-बटाट्याची भाजी शिजल्यावर वरून कोथिंबीर भुरभुरा.