Shreya Maskar
दही पोहे बनवण्यासाठी पोहे, दही, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे, कढीपत्ता, शेंगदाणे, तूप, हिंग, साखर, हळद आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
दही पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम पोहे पाण्यात भिजवून घ्या.
दह्यामध्ये थोडेसे पाणी टाकून फेटून घ्या.
फेटलेल्या दहीमध्ये पोहे, मीठ, साखर मिक्स करा.
पॅनमध्ये तूप टाकून जिरे, मोहरी, हिंग आणि हळद घालून फोडणी तयार करा.
फोडणी तडतडली की त्यात हिरव्या मिरच्या, शेंगदाणे आणि कढीपत्ता टाका.
तयार फोडणी दह्यात भिजवलेल्या पोह्यांवर घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या.
शेवटी दही पोह्यांवर हिरवीगार कोथिंबीर घालून आस्वाद घ्या.