Shreya Maskar
कांचीपुरम इडली बनवण्यासाठी तांदूळ, उडदाची डाळ, हरभरा डाळ, हिंग, काळे मिरे, जिरे, आले, कढीलिंब, काजू आणि चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य लागते.
कांचीपुरम इडली बनवण्यासाठी तांदूळ, उडदाची डाळ, हरभरा डाळ रात्री भिजत घालून सकाळी वाटून पीठ आंबायला ठेवा.
या पिठात जिरे, मिरे पूड, हिंग आणि मीठ टाका.
आता छोट्या पॅनमध्ये काजूचे तुकडे, कढीलिंब टाकून तडका बनवा.
तयार तडका इडलीच्या सारणात टाका.
यात आले किसून मिक्स करा.
इडली पात्रात हे मिश्रण टाकून त्याच्या गरमागरम इडली बनवा.
टोमॅटो चटणी सोबत कांचीपुरम इडलीचा आस्वाद घ्या.