Fort In Dapoli : इतिहासप्रेमींसाठी खास; दापोलीला गेल्यावर पाहायला विसरू नका 'हा' किल्ला, मिळतो समुद्रदृश्यांचा अद्भुत अनुभव

Shreya Maskar

दापोली

कनकदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात, हर्णे बंदराजवळ समुद्रात एका उंच खडकावर वसलेला आहे. कनकदुर्ग किल्ला हा १७ व्या शतकातील आहे.

Dapoli | google

कनकदुर्ग किल्ला

कनकदुर्ग किल्ल्यावरून अरबी समुद्र, विशाळगड, सुवर्णदुर्ग किल्ला या जलदुर्गाचे विहंगम दृश्य दिसते. येथे एक दीपगृह, पाण्याची टाकी आणि खडकाळ किनारपट्टी पाहायला मिळते.

Kanakdurg Fort | google

तटबंदी

मुख्य सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी बांधलेल्या कनकदुर्ग गडाची तटबंदी आणि अवशेष आता बऱ्याच अंशी नष्ट झाले आहेत, मात्र गडाच्या प्रवेशद्वाराजवळ काळ्या पाषाणातील एक मजबूत बुरुज आणि पश्चिमेकडील काही तटबंदी आजही शाबूत आहे。

Fortifications | google

अरबी समुद्र

कनकदुर्ग तीनही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला आहे. किल्ल्यावरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. सुट्ट्यांमध्ये येथे फिरायला नक्की जा.

Arabian Sea | google

मराठा आरमार

कनकदुर्ग किल्ला हा मराठा आरमारासाठी (नौदलासाठी) खूप महत्त्वाचा मानला जातो. तुम्ही येथे फॅमिलीसोबत नक्की फेरफटका मारायला जा.

Maratha Navy | google

जलकुंडा

कनकदुर्ग या लहान किल्ल्यावर खडकात कोरलेल्या ९ पाण्याच्या टाक्यांचा (जलकुंडांचा) समूह आहे. तसेच, किल्ल्याच्या दक्षिण टोकावर एक दीपगृह आहे.

Water | google

दापोली पिकनिक स्पॉट

दापोली येथे मुरुद बीच, लाडघर बीच, करडे बीच, पन्हाळेकाजी लेणी, केशवराज मंदिर अशी नयनरम्य पिकनिक स्पॉट्स आहेत.

beach | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | google

NEXT : मुंबईजवळील 'मिनी गोवा' पाहिलात का? शहराच्या गोंगाटापासून दूर असलेल्या 'या' पिकनिक स्पॉटवर वीकेंडला जाच

Bhayandar Tourism | saam tv
येथे क्लिक करा...