Shreya Maskar
सध्या मराठी अभिनेत्री शिवाली परब कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगली चर्चेत असते.
शिवालीने आपल्या अभिनयाच्या आणि कॉमेडीच्या जोरावर स्वतःची ओळख बनवली आहे.
आपल्या वेगवेगळ्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतेच शिवालीने समुद्रकिनारी हटके फोटोशूट केले आहे, ज्याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
शिवाली मिल्टी कलर प्रिटेंड शॉर्ट टॉप आणि शॉर्ट स्कर्ट परिधान केला आहे.
बीचवर वाळूमध्ये उभे राहून शिवालीने कातिल पोज दिल्या आहेत.
या फोटोला तिने "मी बीच थेरपी घेत आहे..." असे खास कॅप्शनं दिले आहे.
शिवालीच्या या बीच लूकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.