Manasvi Choudhary
जेवताना तोंडी लावण्यासाठी अनेक चमचमीत पदार्थ खाल्ले जातात.
पापड, लोणचे आणि चटणी हे पदार्थ जेवणाची चव आणखी वाढवतात.
आता आम्ही तुम्हाला घरीच काळ्या तिळाची चटणी कशी बनवायची रेसिपी सांगणार आहे.
काळ्या तिळाची चटणी बनवण्यासाठी काळे तीळ, शेंगदाणे, लाल मिरची, मीठ आणि लसूण हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम गॅसवर कढईत तीळ भाजून घ्या . नंतर लगेचच शेंगदाणे भाजून घ्या.
नंतर तीळ आणि शेंगदाणे थंड करा . तीळ मिक्समध्ये बारीक वाटून घ्या नंतर मिक्सरमध्ये शेंगदाणे, लाल मिरची आणि मीठ हे साधारण जाडसर वाटून घ्या.
आता हे संपूर्ण मिश्रणात एकत्र करा. अशाप्रकारे तिळाची चटणी तयार आहे.