Priya More
मसाल्याच्या पदार्थांमधील काळी मिरी आरोग्यासाठी फायदेशीर असते. तिचे अनेक औषधी गुणधर्म आहेत.
काळी मिरीची चिमूटभर पूड ६ पदार्थांसोबत खाल्ली तर तुमच्या अनेक समस्यांवर उपाय ठरेल. यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल.
दही खाताना त्यामध्ये चिमूटभर काळी मिरीची पूड टाकून खाल्लं तर पचनक्रिया सुधारते आणि पोट फुगत नाही.
एक चमचा मधामध्ये चिमूटभर काळी मिरीची पूड टाकून खाल्लं तर खोकला आणि घसादुखी कमी होते.
एक चमचा मधामध्ये चिमूटभर काळी मिरीची पूड टाकून खाल्लं तर कफची समस्या दूर होते.
लिंबाच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळी मिरीची पूड टाकली तर अन्न पचायला सोपे जाते.
आवळ्याच्या रसामध्ये चिमूटभर काळी मिरीची पूड टाकली तर व्हिटॅमिन सीला रक्तप्रवाहात अधिक वेगाने पोहोचवण्यास मदत होते.
एक ग्लास हळदीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळी मिरीची पूड मिक्स करून प्यायल्याने कर्क्यूमिनचे शोषण वाढण्यास मदत करते.
दुधामध्ये काळी मिरीची पूड मिक्स करून प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पचनक्रिया सुधारते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. साम टिव्ही याचं समर्थन करत नाही.