Priya More
झोपेत अनेकांना दात कराकरा चावण्याची सवयी असते. ही एक गंभीर समस्या आहे.
झोपेत दात चावण्याची सवयीला वैद्यकीय भाषेमध्ये 'ब्रुक्सिझम' असे म्हटले जाते. ही एक गंभीर समस्या आहे.
लहानांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत अनेक जण या समस्येने त्रस्त असतात. ते झोपेत दात चावतात. यामुळे शेजारी झोपणाऱ्यांना त्रास होतो.
झोपेत सतत दात चावल्यामुळे दात झिजू शकतात आणि जबडा दुखू शकतो.
दिवसभराचा ताण किंवा चिंता यामुळे रात्री झोपेत अनेक जण दात चावतात.
शरीरामध्ये व्हिटॅमिन डी किंवा मॅग्नेशियमची कमतरता असल्यात दात चावण्याची समस्या उद्भवू शकते.
जे जास्त चहा, कॉफी आणि दारूचे सेवन करतात त्यांना रात्री झोपेत दात चावण्याची सवयी असते.
तु्म्ही रात्री दात चावत असला तर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर दातांमध्ये संवेदनशीलता जाणवेल. त्यासोबत डोकेदुखी, जबड्यामध्ये वेदना होतील.
घोरणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे हे रात्री झोपेत दात चावण्याचे मुख्य कारण असू शकते.
पुरेशी झोप न झाल्यास किंवा झोपेच्या नियमित वेळा बदलल्या आणि ताण असल्यास व्यक्ती झोपेत दात चावतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. साम टिव्ही याचं समर्थन करत नाही.