Watermelon Bhaji Recipe: कलिंगड खाऊन साल फेकून देताय? थांबा! ही पौष्टिक 'कलिंगड भाजी' बनवा; चव विसरणार नाही

Manasvi Choudhary

कलिंगड

उन्हाळ्यात कलिंगड या फळाचे सेवन सर्वजण करतात. कलिंगड सॅलड, कलिंगड ज्यूस बनवून खाल्ला जातो.

Watermelon

कलिंगडाची भाजी

पण आज आम्ही तुम्हाला कलिंगडाच्या भाजीची रेसिपी सांगणार आहोत.

Watermelon Bhaji Recipe

चवदार आणि पौष्टिक भाजी

तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण खरंच कलिंगडाची भाजी ही चवदार आणि पौष्टिक असते.

Watermelon

पांढऱ्या सालीचा करा वापर

आपण सर्वजण कलिंगडातील लाल रंगाचा गर खाल्ल्यानंतर पांढरी साल फेकून देतो. मात्र तुम्हाला माहितीये का, कलिंगडाच्या पांढऱ्या रंगाच्या सालीपासून तुम्ही भाजी बनवू शकता.

Watermelon Bhaji Recipe

साहित्य

कलिंगडाची भाजी बनवण्यासाठी तुम्हाला कलिंगडाच्या पांढरा भाग, कांदा, कढीपत्ता, जिरे, मोहरी, हिरवी मिरची, मीठ, तेल, कश्मिरी मिरची, लाल मसाला, हळद, आलं- लसूण पेस्ट, सुक्या खोबऱ्याचे वाटण हे साहित्य एकत्र करा.

Watermelon Bhaji Recipe

कलिंगडाच्या सालीचे बारीक काप करा

सर्वातआधी कलिंगडाच्या पांढऱ्या भागाचे बटाट्याच्या फोडी प्रमाणे बारीक काप करून घ्या.

Watermelon Bhaji Recipe

भाजीसाठी फोडणी करा

गॅसवर कढईमध्ये कढीपत्ता,जीरे, मोहरी आणि बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या.

Fodni

मसाले मिक्स करा

नंतर या मिश्रणात टोमॅटो, आलं- लसूण पेस्ट, सुक्या खोबऱ्याचे वाटण मिक्स करा. नंतर यात हळद, मसाला आणि मीठ हे मिक्स करून तुम्ही भाजीवर झाकण ठेवा.

Spices | yandex

चमचमीत भाजी होईल तयार

भाजी शिजल्यानंतर त्यावर झाकण ठेवा. घरच्या घरी कलिंगडाची चमचमीत भाजी तयार होईल.

Watermelon Bhaji Recipe

NEXT: Navi Mumbai Picnic Spot: खारघरचं सेंट्रल पार्क ते बेलापूरचं पारसिक हिल, नवी मुंबईतील ही 5 ठिकाणे पर्यटकांना घालतायेत भुरळ

येथे क्लिक करा...