Manasvi Choudhary
काळा वटाणा रस्सा ही मालवणी व कोकणी स्टाईल प्रसिद्ध भाजी आहे.
काळा वटाणा रस्सा भाजी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
काळा वटाणा रस्सा भाजी बनवण्यासाठी काळे वटाणे, कांदे, सुकं खोबरे, मालवणी मसाला, हळद, धनापावडर, मीठ, तेजपत्ता, कढीपत्ता, हिंग, तेल हे साहित्य एकत्र करा.
सर्वातआधी भिजवलेले काळे वटाणे कुकरमध्ये मीठ आणि हळदीच्या पाण्यात शिजवून घ्या.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्या. त्यात सुके खोबरे भाजून घ्या.
मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात आले, लसूण आणि कोथिंबीर टाकून मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या.
कढईत तेल गरम करून त्यात हिंग, तमालपत्र आणि कढीपत्त्याची फोडणी द्या. तयार केलेले वाटण तेलात परता. वाटणाला तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्या.
आता त्यात मालवणी मसाला, धणे पावडर आणि हळद टाका. मसाल्याचा खमंग वास सुटला की त्यात शिजवलेले काळे वाटाणे टाका आणि चांगले शिजवून घ्या