Shreya Maskar
काजू पिस्ता रोल बनवण्यासाठी काजू, पिस्ता, साखर, वेलची पावडर, सिल्वर लीफ इत्यादी साहित्य लागते.
काजू पिस्ता रोल बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये पाण्यात काजू भिजवत ठेवा.
दुसरीकडे पिस्ताची साल काढून घ्या.
काजू आणि पिस्ताची एकत्र छान पेस्ट करून घ्या.
आता या मिश्रणात साखर घालून वितळवून घ्या.
पुढे या मिश्रणात वेलची पावडर घालून गॅस बंद करा.
एका ताटात पिस्ता-काजूची पेस्ट पसरवून घ्या.
त्यावर सिल्वर लीफ लावून आवडत्या आकारामध्ये बर्फी कापून घ्या.