Kaju Katli Recipe: खास कार्यक्रम किंवा सणासुदीसाठी घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट काजू कतली; वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

२ कप काजू, १ कप साखर, ½ कप पाणी , १ टीस्पून तूप , वेलची पूड (ऐच्छिक), चांदीचा वर्ख (ऐच्छिक)

Kaju Katli Recipe | Google

काजूची पावडर तयार करा

काजू २–३ तास फ्रिजमध्ये ठेवून थंड करा. त्यानंतर मिक्सरमध्ये पल्स मोडवर बारीक वाटून पावडर तयार करा. जास्त वेळ वाटू नका, अन्यथा तेल सुटू शकते.

kaju katli | goggle

साखरेचा पाक तयार करा

कढईत साखर आणि पाणी घालून मध्यम आचेवर गरम करा. एकतारी पाक तयार झाल्यावर गॅस मंद करा.

kaju katli | goggle

काजूची पावडर मिसळा

तयार पाकामध्ये काजूची पावडर घालून सतत हलवत राहा. मिश्रण घट्ट होऊन गोळ्यासारखे होईपर्यंत शिजवा.

kaju katli | goggle

मिश्रण मळून घ्या

मिश्रण कोमट झाल्यावर हाताला थोडे तूप लावून हलक्या हाताने मळा. यामुळे काजू कतली अधिक मऊ बनते.

kaju katli | goggle

लाटून कापा

बटर पेपर किंवा तुपाचा हात लावलेल्या पृष्ठभागावर मिश्रण पातळ लाटा. त्यावर चांदीचा वर्ख लावून हिऱ्याच्या आकारात कापा.

kaju katli | goggle

सर्व्ह करा

काजू कतली पूर्णपणे थंड झाल्यावर सर्व्ह करा. हवाबंद डब्यात भरून काही दिवस साठवूनही ठेवू शकता. सण, वाढदिवस किंवा पाहुणचारासाठी ही उत्तम मिठाई आहे.

Kaju Katli Recipe | Google

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे 7 ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

Palazzo Design for Monsoon | saam Tv
येथे क्लिक करा