Shreya Maskar
पावसाळ्यात मेकअपची विशेष काळजी घ्यावी लागते, नाहीतर पाण्यामुळे मेकअप खराब होतो.
पावसाळ्यात आय मेकअप लवकरच खराब होण्याचा धोका असतो, त्यामुळे प्रोडक्ट चांगले वापरावे.
पावसाळ्यात काजळ सतत पसरत असेल, तर खालील गोष्टी आताच लक्षात घ्या. नाहीतर पुढे डोळ्यांना देखील त्रास होईल.
पावसाळ्यात काजळ पसरू नये म्हणून वॉटरप्रूफ काजळचा वापर करा.
काजळ लावण्यापूर्वी डोळ्यांभोवती प्राइमर लावून बेस तयार करा. ज्यामुळे काजळ पसरणार नाही दीर्घकाळ टिकेल.
काजळ लावण्यापूर्वी डोळ्याखाली पावडर लावा, ज्यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेतले जाते.
पावसाळ्यात शक्यतो काजळ पेन्सिलचा वापर करा.
काजळ लावल्यानंतर मेकअप सेटिंग स्प्रे वापरा. म्हणजे काजळ पसरणार नाही.