Shreya Maskar
कच्च्या कैरीपासून कोकण स्पेशल मेथांबा बनवा.
कच्च्या कैरीचा मेथांबा बनवण्यासाठी कैरी, लाल तिखट, जिरे पावडर, गूळ, मेथी, तेल, हिंग आणि मोहरी इत्यादी साहित्य लागते.
कैरीचा मेथांबा बनवण्यासाठी सर्वप्रथम कैरी स्वच्छ धुवून साल काढून बारीक तुकडे करून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, मेथीचे दाणे आणि हिंग टाकून भाजून घ्या.
यात कैरी टाका आणि छान शिजवून घ्या.
मिश्रणाला पाणी सुटल्यावर लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
शेवटी कैरी शिजल्यानंतर त्यात गूळ मिक्स करा.
चटपटीत कच्च्या कैरीचा मेथांबा गरमागरम चपातीसोबत खा.