Kairi Chutney Recipe: भाजलेल्या कैरीची 'चटपटीत' आंबट- गोड चटणी, अवघ्या १० मिनिटांत बनवा, नोट करा 'ही' रेसिपी

Manasvi Choudhary

कैरी

उन्हाळ्यात कैरी खायला सर्वानाच आवडते. कैरीच्या अनेक वेगवेगळ्या रेसिपी महिला घरी बनवतात.कैरीची आंबट- गोड चटणी तुम्ही खाल्लीच असेल पण, तुम्ही कधी कैरीची भाजून चटणी बनवली आहे का?

Kairi | yandex

कैरीची चटणी

कैरीची भाजून केलेली चटणी चविला अत्यंत चवदार लागते. तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने ही चटणी बनवू शकता.

Kairi Chutney

कैरी चटणी रेसिपी

कैरीची चटणी बनवण्यासाठी कैरी, लसूण पाकळ्या, सुक्या लाल मिरच्या, जिरे आणि गूळ हे साहित्य घ्यायचे आहे.

सर्वातआधी कैरी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर गॅसवर किंवा चुलीवर तुम्ही कैरी भाजून घ्या.

Kairi Chutney Recipe

कैरी भाजून घ्या

कैरी भाजल्यानंतर तुम्ही लसूण आणि लाल मिरच्या देखील भाजून घ्यायच्या आहेत.

नंतर एका भांड्यामध्ये भाजलेल्या कैरीची साल काढून त्याचा गर काढा.

Roasted Raw Mango

मिश्रण बारीक करा

मिक्सरमध्ये किंवा खलबत्यात तुम्ही भाजलेल्या कैरीचा गर, भाजलेल्या लाल मिरच्या, लसूण, जिरे हे बारीक करून घ्या.

मिक्सरपेक्षा खलबत्त्यात किंवा पाटा-वरवंट्यावर वाटलेली चटणी चवदार लागते.

Kairi Chutney Recipe

गूळ मिक्स करा

वाटून घेतलेल्या मिश्रणात गूळ मिक्स करा. आणि संपूर्ण मिश्रण एकजीव करा.

अशाप्रकारे घरच्या घरी आंबट- गोट चटपटीत कैरीची चटणी तयार होईल. ही चटणी फ्रिजमध्ये २-३ दिवस टिकते.

Kairi Chutney Recipe | GOOGLE

NEXT: Watermelon Storage Tips: कापलेला कलिंगड फ्रिजमध्ये ठेवायचा की नाही? जाणून घ्या

येथे क्लिक करा...