Shreya Maskar
पावसाळ्यात साताऱ्यातील कास पठार या ठिकाणाला नक्की भेट द्या. हे ठिकाण पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगेत उंचावर वसलेले आहे. येथून निसर्गाचा अद्भूत नजारा पाहायला मिळतो.
कास पठार हे महाराष्ट्राची 'फुलांची दरी' (व्हॅली ऑफ फ्लावर्स) म्हणून प्रसिद्ध आहे. हे युनेस्को (UNESCO) जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ आहे.
दरवर्षी पावसाळ्यात कास पठार (ऑगस्ट ते ऑक्टोबर) विविध रंगांनी बहरून जाते. येथे ८५० हून अधिक प्रकारची दुर्मिळ रानफुले, ऑर्किड्स आणि स्थानिक वनस्पतींचा नैसर्गिक गालीचा पाहायला मिळतो.
कास पठार पश्चिम घाटातील अद्वितीय वनस्पती, स्थानिक प्रजाती आणि विविध फुलपाखरे, कीटकांचे हे निवासस्थान आहे. येथे हंगामी रानफुले पाहायला मिळतात. फोटोशूटसाठी हे भन्नाट लोकेशन आहे.
सातारा येथील कास पठार फ्लॉवर फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. हा फुलांचा रंगीबेरंगी उत्सव सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत चालतो. परदेशी पर्यटकही येथे गर्दी करतात.
दर काही आठवड्यांनी, फुलांच्या वेगवेगळ्या प्रजाती उमलतात आणि कोमेजतात, त्यामुळे या पठाराचा प्रमुख रंग बदलतो. साताऱ्याजवळ सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले हे पठार, बेसॉल्टिक ज्वालामुखीच्या मातीत आढळणाऱ्या दुर्मिळ आणि स्थानिक वनस्पती प्रजातींना आधार देते.
मुंबईहून साताऱ्याला ट्रेनने प्रवास करा. साताऱ्यापासून कास पठारापर्यंत जाण्यासाठी तुम्ही रिक्षा, टॅक्सी किंवा स्थानिक बसचा मार्ग निवडा.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.
NEXT : पावसाच्या सरी अन् हिरवागार निसर्ग, विकेंडला फिरूया कोपरजवळची 'ही' ठिकाणं