Manasvi Choudhary
चैत्र पौर्णिमेला कोल्हापूरमध्ये ज्योतिबा देवाच्या उत्साहाला सुरूवात झाली आहे.
मोठ्या भक्तिमय वातावरणात या यात्रेमध्ये भाविक सहभागी झाले आहेत.
ज्योतिबा यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे ज्योतिबा देवाची पालखी.
ज्योतिबा देवाच्या पालखीत गुलालाची उधळण करण्याची परंपरा आहे.
या यात्रेमध्ये ५० फूट लांबीच्या सासन काठ्यांना सजवून मिरवणूक काढली जाते.
'ज्योतिबाच्या नावानं चांगभल' या नावाने जयघोष करत पालखी निघते.
गुलाल हे विजयाचं आणि आनंदाचं प्रतीक मानलं जातं.
जोतिबाच्या यात्रेत गुलाल उडवून दैत्यांवर मिळवलेल्या विजयाचा जल्लोष केला जातो.
गुलालाने संपूर्ण जोतिबा परिसर गुलाबी होतो, त्यामुळे या देवस्थानाला “गुलाबी जोतिबा” असंही म्हटलं जातं.