Manasvi Choudhary
आज सर्वत्र हनुमान जंयती साजरी होत आहे.
हनुमान हे शक्ती आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते.
अख्यायिकेनुसार, रामाने वानरसेना लंकेला नेली आणि रावणाशी युद्ध केले.
यावेळी युद्धामध्ये हनुमानाने रामाला मोठी मदत केली. जेव्हा लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याच्या उपचारांसाठी हनुमानाने उत्तराखंडातील द्रोणागिरी पर्वताकडे झेप घॆतली.
पर्वतावर हनुमानाला उपचारासाठी संजीवनी वनस्पती ओळखू न आल्याने त्याने सर्व द्रोणागिरी पर्वत उचलून आणला.
लक्ष्मणाला बरे करण्यासाठी त्यांनी हा पर्वत उचलून संजीवनी वनस्पती आणली होती.
संजीवनी बुटी ही औषधी वनस्पती आहे.