Manasvi Choudhary
यंदा रविवार म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२५ रोजी गौरी आवाहन आहे.
गौरी आवाहन शुभमुहूर्त सायंकाळी ५.२५ पर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात आहे.
सोमवार १ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचे पूजन करावे.
मंगळवारी २ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेपर्यंत मूळ नक्षत्रावर ज्येष्ठ गौरीचे विसर्जन करावे.
गौरीला गणपतीची माता पार्वती असे म्हटले जाते.
प्रथेनुसार, तेरड्याच्या, खड्यांच्या, मुखवट्यांच्या किंवा मूर्तीच्या रूपात गौरी आणल्या जातात.
गौरीला माहेरवाशीण म्हटले जाते. गौरीच्या सणाला माहेरी येते.