Manasvi Choudhary
दिवसभराची धावपळ, ऑफिसचे टेन्शन आणि घरची कामे यामुळे शरीर फार थकून जातं यासाठी तुम्हाला रात्री शांत झोप घेणे महत्वाचे आहे.
रात्री तेलाने मालिश केल्याने चांगली झोप लागते व शरीराला देखील फायदा होतो.
तिळाचे तेल आरोग्यासाठी फायद्याचे आहे. तिळाच्या तेलाने रात्री पायांची व सांध्याची मालिश केल्याने फायदा होतो.
ज्यांना रात्री डोक्यात उष्णता जाणवते किंवा विचारामुळे झोप येत नाही त्यांनी डोक्याची खोबरेल तेलाने मालिश करावीय
जर तुम्हाला थकव्यासोबतच चेहऱ्यावरची चमक पाहिजे असेल तर बदाम तेलाचा वापर करा. रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये बदाम तेल लावल्याने फायदा होतो.
जर तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस असेल, तर खोबरेल किंवा बदामाच्या तेलात लॅव्हेंडर ऑईलचे २ थेंब मिसळून कपाळावर आणि मानेवर मसाज करा.
तेल नेहमी थोडे कोमट करूनच वापरावे. यामुळे ते त्वचेत लवकर शोषले जाते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.