ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मायग्रेनमध्ये डोक्याच्या एका भागात तीव्र वेदना होतात. तसेच हात-पाय दुखणे, अंधुक दिसणे अशा समस्या जाणवतात.
झोप पूर्ण न होणे, ताणतणाव, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि हार्मोनल इमबॅलेन्स यामुळे मायग्रेनचा त्रास वाढतो.
मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी लाइफस्टाइलसह योग्य आहाराची देखील काळजी घेतली पाहिजे.
मायग्रेन असल्यास कॅफीन, प्रोसेस्ड फूड, गोड पदार्थ किंवा जास्त प्रमाणात मीठ असलेले पदार्थ खाणं टाळा.
चॉकलेटमध्ये कॅफीनसह टायरामिन असते ज्यामुळे मायग्रेनचा त्रास वाढतो. म्हणून चॉकलेटचे सेवन प्रमाणात केले पाहिजे.
मायग्रेनचा त्रास असल्यास हिरव्या भाज्या, फळे, कडधान्य आणि ड्राय फ्रुट्सचे सेवन करा. या गोष्टींचे सेवन केल्यास शरीराला व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात.
रोजच्या जीवनातील ताणतणाव कमी करा. यासठी रोज ७ ते ८ तासांची झोप घ्या. यासोबतच व्यायाम, मेडिटेशन करा आणि तुमचे आवडते संगीत ऐका.