Shruti Vilas Kadam
सरळ उभे राहा. पाय एकत्र आणि हात शरीराच्या बाजूला ठेवा. उडी मारताना पाय बाजूला घ्या आणि हात डोक्याच्या वर न्या. पुन्हा उडी मारून सुरुवातीच्या स्थितीत या. असे ३० वेळा करा.
सुरुवातीला ३० जंपिंग जॅक्स सलग करण्याऐवजी १०-१० चे ३ सेट करू शकता. उडी मारताना गुडघे किंचित वाकवून उतरा आणि शरीरावर अनावश्यक ताण येणार नाही याची काळजी घ्या.
३० जंपिंग जॅक्स केल्याने शरीराची हालचाल वाढते आणि कॅलरी बर्न होण्यास मदत होते.
जंपिंग जॅक्समध्ये उडी मारणे आणि उतरणे यामुळे पायांच्या स्नायूंना चांगला व्यायाम होतो.
नियमितपणे केल्याने शरीराची सहनशक्ती आणि एनर्जी वाढण्यास मदत होऊ शकते.
हात आणि पाय एकाच वेळी हलत असल्यामुळे शरीराच्या अनेक स्नायूंची हलचाल होते.
हा कार्डिओ व्यायाम असल्याने हृदयाची गती वाढते आणि कार्डिओव्हॅस्क्युलर फिटनेस सुधारण्यास मदत होते.
डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.