ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या अभिनयाने आणि दिलखेचक अंदाजाने प्रेक्षकांची मने जिकंत असते.
प्राजक्ताची जुळून येती रेशीमगाठी ही मालिका चाहत्यांना खूप आवडली होती.
प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सूत्रसंचालन करत आहे.
प्राजक्ता माळीचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ रोजी झाला.
प्राजक्ता मूळची पंढरपूरची आहे. तिचे बालपण पुण्यात गेले.
प्राजक्ता माळीचे सध्याचे वय ३५ वर्षे आहे.
प्राजक्ता माळीने प्राजक्तराज नावाचे कवितांचे पुस्तकदेखील प्रकाशित केले आहे.
प्राजक्ताचे कर्जत येथे प्राजक्तकुंज नावाचे फार्महाउस आहे.