ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जुई भागवतने तुमची मुलगी काय करते या सोनी मराठीच्या मालिकेमधून आपला दमदार अभिनय प्रेक्षकांसमोर दाखवून दिला.
त्यानंतर जुईने अमेय वाघ आणि अमृता खानविलकर यांच्या लाईक अँड सबस्क्राईब या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली.
आता जुई केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक या चित्रपटात दिसणार आहे.
झापूक झुपक या चित्रपटातील पोराचा बाजार उठला रं हे रोमँटिक गाणं प्रदर्शित झाल्यापासून जुईची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे.
जुई भागवत लवकरच प्रसाद ओकच्या गुलकंद या चित्रपटात झळकणार आहे.
जुईला अभिनयासोबत संगीताची देखील आवड आहे.
जुई भागवत ही एक उत्तम कथक नृत्यांगना आहे.