Shreya Maskar
मुंबईत विलेपार्ले हे जुहूच्या पूर्वेला आहे. विलेपार्ले आणि सांताक्रूझ या उपनगरांमधून जुहू बीचला जाता येते.
जुहू बीचला जुहू चौपाटी म्हणून ओळखले जाते. जुहू बीच तेथील चवदार, चटपटीत स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध आहे.
सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुंदर नजारा जुहू बीचवर पाहायला मिळतो. त्यामुळे येथे संध्याकाळी थोडी गर्दी पाहायला मिळते.
विलेपार्ले रेल्वे स्टेशन वरून रिक्षाने तुम्ही जुहू बीचला जाऊ शकता. फक्त १०- १५ मिनिटांत बीचवर पोहचाल.
जुहू बीचवर घोडेस्वारी आणि बोटिंगचा आनंद घेऊ शकता. येथे लहान मुलांना तुफान मजा-मस्ती करता येईल.
जुहू एरियात अनेक सेलिब्रिटींचे आलिशान घर आणि बंगले आहेत. तसेच अनेक लग्जरी रेस्टॉरंट देखील आहेत.
जुहू चौपाटीवर सकाळी स्थानिक लोक जॉगिंग करताना दिसतात. येथे अनेक नारळपाणीचे स्टॉल देखील आहेत.
निसर्गाच्या सानिध्यात सुंदर फोटोशूट करायचे असेल तर जवळच असलेल्या जुहू बीचला आवर्जून भेट द्या. येथे तुम्ही छान रील देखील बनवू शकता.