Surabhi Jayashree Jagdish
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढते आणि त्यामुळे थकवा, डिहायड्रेशनसारख्या समस्या जाणवतात. अशा वेळी ज्वारीची भाकरी शरीराला नैसर्गिक थंडावा देण्यास मदत करते.
ज्वारीचा स्वभाव थंड असतो, त्यामुळे ती शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. उन्हाळ्यात शरीर गरम झाल्यास ज्वारीची भाकरी खाल्ल्याने थंडावा मिळतो. त्यामुळे उष्माघाताचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
ज्वारीमध्ये भरपूर फायबर असते, जे पचनक्रिया सुधारतं. उन्हाळ्यात जड अन्न पचायला त्रास होतो, पण ज्वारीची भाकरी हलकी असल्याने ती सहज पचते. त्यामुळे पोट हलकं राहून अॅसिडिटीची समस्या कमी होते.
ज्वारी शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या कमी होण्यास हातभार लागतो. उन्हाळ्यात शरीराला आवश्यक हायड्रेशन राखण्यासाठी ज्वारी उपयुक्त ठरते.
ज्वारीमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात, जे हळूहळू ऊर्जा देतात. त्यामुळे दिवसभर शरीरात स्थिर उर्जा टिकून राहते. उष्णतेमुळे येणारा थकवा कमी करण्यासाठी ज्वारी मदत करते.
ज्वारीतील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला निरोगी ठेवतात. उन्हाळ्यात त्वचा कोरडी किंवा निस्तेज होण्याची शक्यता असते. पण ज्वारी खाल्ल्याने त्वचेला पोषण मिळतं. त्यामुळे त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते.
ज्वारीमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्याने ती वजन नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. ती खाल्ल्यानंतर जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे अनावश्यक खाणं टाळता येतं आणि वजन वाढण्यावर नियंत्रण ठेवता येते.