Saam TV News
रोजच्या आहारात सर्वांनी पौष्टीक पदार्थ खाल्याने आपल्याला सहसा कोणत्याही आजाराची लागण होत नाही.
त्यात प्रत्येक व्यक्तीच्या घरात डाळ, भात, भाजी, चपाती किंवा भाकरी हे पदार्थ असतात.
मात्र कोणतेही पदार्थ कोणत्याही पदार्थांसोबत खात असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होत नाही.
जसे तुम्ही भात आणि चपाती एकत्र खावू शकत नाही तसेच पालेभाज्यांचे सुद्धा आहे.
तुम्ही कोणत्या पालेभाज्यांसोबत कोणती भाकरी खावी आणि का याचे उत्तर पुढील माहितीत तुम्हाला मिळेल.
मेथीची भाजी, पालकाची भाजी, माठाची भाजी, शेपूची भाजी, हरभऱ्याच्या पानांची भाजी, करडईची भाजी यासोबत ज्वारीची भाकरी छान लागते.
ज्वारी पचायला हलकी असते आणि फायबरयुक्त असल्याने आरोग्यासाठी लाभदायक असते.
तोंडली-पालेभाजीची भाजी, शेवग्याच्या पानांची भाजी, कांद्याच्या पातीची भाजी म्हणजेच आंबट चव असलेल्या किंवा रसशीत भाज्यांसोबत तुम्ही तांदळाची भाकरी खावी.