Jowar Khichdi Recipe: डाईट सुरु केला आहे पण टेस्टी खायची इच्छा होते? मग रात्री घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी ज्वारीची खिचडी

Shruti Vilas Kadam

साहित्य

ज्वारी – 1 कप (रात्रभर भिजवलेली), गाजर – 1 (बारीक चिरलेले), बटाटा – 1 (चिरलेला), मटार – ½ कप, शेंग – ½ कप, टोमॅटो – 1 (चिरलेला), हळद – ½ टीस्पून, लाल मिरची पावडर – ½ टीस्पून, मीठ – चवीनुसार, मोहरी – ½ टीस्पून, जिरे – ½ टीस्पून, हिंग – 1 चिमूट, कढीपत्ता – 6–7 पाने, तूप किंवा तेल – 2 टेबलस्पून, पाणी – अंदाजे 3 कप, कोथिंबीर – सजावटीसाठी

Jowar Khichdi Recipe | Social Media

ज्वारी भिजवणे

ज्वारीची खिचडी बनवण्यासाठी प्रथम ज्वारी 4–5 तास किंवा रात्रभर भिजवून ठेवा. त्यामुळे ज्वारी शिजायला सोपी होते आणि खिचडीला उत्तम टेक्स्चर मिळते.

Jowar Khichdi Recipe | Social Media

भाज्या चिरून तयार ठेवणे

गाजर, बटाटा, मटार, शेंग, टोमॅटो यांसारख्या भाज्या बारीक चिरून ठेवा. भाज्यांमुळे खिचडी अधिक पौष्टिक आणि रंगीत बनते.

Jowar Khichdi Recipe | Social Media

फोडणी तयार करणे

कढईत तेल/तूप गरम करून मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता घाला. ही फोडणी खिचडीच्या चवीला विशेष उठाव देते.

Jowar Khichdi Recipe | Saam tv

भाज्या परतणे

फोडणीत चिरलेल्या भाज्या घालून हलके परतून घ्या. यामुळे भाज्या मऊ होतात आणि त्यांचा नैसर्गिक स्वाद वाढतो.

Jowar Khichdi Recipe | Canva

ज्वारी आणि मसाले मिसळणे

भिजवलेली ज्वारी पाणी काढून भाज्यांमध्ये घाला. त्यात हळद, मीठ, थोडी मिरची पावडर आणि गरजेनुसार मसाला घाला.

Jowar Khichdi Recipe | Saam tv

पाणी घालून शिजवणे

खिचडीसाठी ज्वारीच्या दुपट पाणी घालून झाकण ठेवून धीमी आचेवर शिजवा. ज्वारी पूर्ण मऊ होईपर्यंत 15–20 मिनिटे शिजू द्या.

Jowar Khichdi Recipe | Saam tv

वरून तूप आणि कोथिंबीर

खिचडी तयार झाल्यावर वरून एक चमचा साजूक तूप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा. यामुळे चव आणि सुगंध दोन्ही वाढतात.

Jowar Khichdi Recipe | Saam tv

रात्री झोपण्याआधी खाण्याची इच्छा होते? मग हे पदार्थ खल्ल्याने होऊ शकतात गंभीर आजार, वेळीच व्हा सावधान

Night Cravings
येथे क्लिक करा