Siddhi Hande
लहान मुलांना टिफिनसाठी रोज काय द्यावे असा प्रश्न महिलांना पडलेला असतो.
तुम्ही मुलांसाठी खास धिरडं बनवू शकतात. धिरडं बनवण्यासाठी तुम्ही ज्वारी किंवा बेसन पीठ वापरु शकतात.
ज्वारी पीठ,रवा, पोहे, जिरं, हिरव्या मिरच्या, ओवा, कांदा, टॉमेटो, मीठ, हळद, लाल तिखट, तेल
सर्वात आधी तुम्ही ज्वारीचे पीठ घ्या. त्यात रवा, पोहे घ्या. रवा आणि पोहे भिजवलेले असावे.
या मिश्रणात बारीक चिरलेली मिरची, जिरं, ओवा, कांदा, कोथिंबीर, मीठ, हळद टाकून मिक्स करा.
यामध्ये पाणी घाला. या पीठाच्या गुठळ्या होऊ देऊ नका.
यानंतर नॉन स्टिक पॅन गरम करा. त्यावर तेल टाका.
यावर तुम्हाला एक चमचाभर पीठ टाकायचे आहे. हे पीठ छान गोलाकार पातळ पसरवून घ्या.
यानंतर दोन्ही बाजूंनी कडांना तेल सोडा. हे धिरडं २-३ मिनिटे शिजवून घ्या.
यानंतर दोन्ही बाजूने छान भाजून घ्या. ही धिरडी तुम्ही चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकतात.
Next: मिथिलाने नेसलेली महेश्वरी साडीचा ट्रेंड करा फॉलो; लग्नात सर्वात सुंदर तुम्हीच दिसाल