Manasvi Choudhary
आपल्यापैकी अनेकांच्या जेवणात भाकरी बनवतात. पारंपरिक जेवणाच्या पद्धतीमध्ये ज्वारी, बाजरी आणि नाचणी या तीन भाकरी करतात. मात्र ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी कोणती भाकरी खावी असा अनेकांना प्रश्न पडतो.
मात्र आरोग्यासाठी पौष्टिक भाकरी डायबिटीजचे रूग्ण खाऊ शकतात का ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, त्यामुळे जर तुम्ही ज्वारीची भाकरी खाल्ली तर ती पचायला हलकी असते आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.
ज्वारीच्या भाकरीमध्ये फायबर असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. डायबिटीजच्या रुग्णांसाठी रोजच्या आहारात ज्वारीची भाकरी खाल्ली तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
बाजरीच्या भाकरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. बाजरीमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते, जे शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते.
नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो तसेच फायबर आणि कॅल्शियम यामध्ये अधिक असते त्यामुळे डायबिटीजचे रूग्ण नाचणीची भाकरी खाऊ शकतात.
नाचणीमध्ये अमिनो अॅसिड आणि फायबर भरपूर असल्याने हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी गुणकारी आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.