JioPC भारतात लाँच, आता कोणताही टीव्ही बनणार तुमचा कम्प्यूटर, कमी किमतीत भन्नाट सुविधा

Dhanshri Shintre

JioPC नाव ठेवले

रिलायन्स जिओने त्यांच्या नवीन क्लाउड कॉम्प्युटिंग सेवेचे नाव JioPC ठेवले असून, आज आपण त्याच्या रिचार्ज आणि वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती घेणार आहोत.

टीव्ही किंवा डिस्प्ले स्क्रीन

रिलायन्स जिओच्या या सेवेमुळे कोणताही टीव्ही किंवा डिस्प्ले स्क्रीन सहजपणे संगणकासारखा वापरता येणार आहे, ती एक मोठी सुविधा ठरणार आहे.

टीव्ही जोडून वापरु शकता

जिओच्या JioPC सेवेसाठी कोणतेही अतिरिक्त हार्डवेअर आवश्यक नाही; केवळ टीव्ही जोडून तुम्ही सहजपणे संगणकाप्रमाणे त्याचा वापर करू शकता.

संगणकाचा अनुभव

JioPC सेवा विद्यार्थ्यांपासून लहान व्यावसायिकांपर्यंत उपयुक्त ठरेल, कारण ती कमी खर्चात लोकांना उच्च दर्जाचा संगणकाचा अनुभव घेण्याची संधी देते.

किफायतशीर दरात

JioPC वापरकर्त्यांना असा अनुभव देतो, जो तब्बल ५०,००० रुपयांच्या पारंपरिक पीसीसारखा वाटतो, आणि तोही अतिशय किफायतशीर दरात मिळणार.

सॉफ्टवेअर अपडेट्स

JioPC यूजर्सना झपाट्याने सुरू होणारी सेवा, स्वयंचलित सॉफ्टवेअर अपडेट्स आणि मजबूत नेटवर्क-स्तरीय सुरक्षा सुविधा सहजतेने अनुभवता येतील.

JioPC

Jio पोर्टलवरील माहितीनुसार, JioPC सुरू करणे सोपे आहे; यासाठी फक्त टीव्ही, Jio सेट-टॉप बॉक्स, कीबोर्ड आणि माउस लागतात.

प्लॅन किंमत

JioPC साठी ₹599 चा प्रारंभिक प्लॅन आहे ज्यात 1 महिन्याची वैधता व अमर्यादित वापर मिळतो; तसेच ₹999 चा 2 महिन्यांचा पर्यायही उपलब्ध.

‍अ‍ॅडोब एक्सप्रेस प्रीमियम

JioPC सेवा घेतल्यावर सर्व प्लॅन्ससोबत अ‍ॅडोब एक्सप्रेस प्रीमियमची मोफत सुविधा मिळेल, अशी माहिती अधिकृत जिओ पोर्टलवर देण्यात आली आहे.

NEXT: OTT प्लॅटफॉर्म्सवर बंदी! पण OTT प्लॅटफॉर्म्स नेमके कधी आणि कसे होतात बंद? वाचा सविस्तर

येथे क्लिक करा