Manasvi Choudhary
मुंबईतील सर्वात मोठ्या 'जिओ वर्ल्ड प्लाझा' या मॉलचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला.
जिओ वर्ल्ड प्लाझा च्या उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली.
या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींच्या फॅशनचा जलवा रॅम्पवर दिसला.
बी टाऊनची सर्वात लोकप्रिय असलेली जोडी दीपिका आणि रणवीरने उद्घाटन सोहळ्यास भेट दिली.
जिओ वर्ल्ड प्लाझा लॉन्चिंगला बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री अलिया भट्ट स्टायलिश अंदाजात दिसली.
यावेळी अलियाने ब्लॅक एम्बल आऊटफिटमध्ये सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
बॉलिवूडची 'बेबो' अर्थात अभिनेत्री करिना कपूर वेस्टर्न लूकमध्ये दिसली.
लाल रंगाच्या साडीमध्ये श्रध्दाने आशा भोसले यांचे 'आओ हुजूर तुम को' हे गाणे गाऊन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं.
सलमान खान, करण जोहर या बॉलिवूड सेलिब्रिटी देखील यावेळी उपस्थित होते.
शहनाज गिल लाल रंगाच्या गाऊनमध्ये फारच सुंदर दिसत होती.
अभिनेत्री नुसरत भरूच्चा आणि मॉडेल मलायका अरोरा आपल्या ग्लॅमरस लूकने सर्वांना आकर्षित करत होत्या.