Dhanshri Shintre
जिओकडे अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत आणि याशिवाय कंपनी काही खास आणि फायदेशीर प्लॅनही देते.
जिओचा एक खास १७५ रुपयांचा एंटरटेनमेंट प्लॅन आहे, ज्यामध्ये ग्राहकांना तब्बल १० ओटीटी प्लॅटफॉर्मचा प्रवेश मिळतो.
१७५ रुपयांच्या या प्लॅनमध्ये फक्त ओटीटी सुविधा नाही, तर डेटा आणि २८ दिवसांची वैधताही दिली जाते.
या प्लॅनमध्ये यूजर्सना २८ दिवसांसाठी एकूण १०GB डेटा मिळतो. तसेच १० ओटीटी सबस्क्रिप्शन दिले जाते.
या प्लॅनद्वारे Sony LIV, Lionsgate Play, Discovery plus तसेच इतर ओटीटी सबस्क्रिप्शन मिळू शकतात.
हे सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म तुम्ही JioTv मोबाईल अॅपद्वारे पाहू शकता, जे फक्त स्मार्टफोन आणि टॅब्लेटसाठी उपलब्ध आहेत.
या प्लॅनद्वारे तुम्हाला तुमच्या टीव्हीवर कंटेट पाहता येणार नाही, तसेच या ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी स्वतंत्र सबस्क्रिप्शनची आवश्यकता नसते.
या प्लॅनअंतर्गत कंटेंट पाहण्यासाठी तुम्हाला JioTV मोबाईल अॅपचा वापर करावा लागेल, ज्याद्वारे सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स पाहता येतील.
या प्लॅनमध्ये कॉलिंग किंवा एसएमएस सुविधा नाहीत. तो फक्त डेटा अॅड-ऑन म्हणून वापरता येतो आणि अतिरिक्त इंटरनेट मिळते.