Dhanshri Shintre
जिओकडे अनेक किमती व फिचर्स असलेले रिचार्ज प्लॅन आहेत. त्यापैकी आज आपण ग्राहकांना विशेष फायदे देणाऱ्या एका अनोख्या रिचार्जबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
जिओकडील स्वस्तातला खास रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत आहे. फक्त ₹४५० पेक्षा कमी किमतीत ८४ दिवसांची वैधता आणि आवश्यक सुविधा मिळतात.
जिओने ४४८ रुपयांचा खास रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून दिला आहे. हा प्लॅन कंपनीच्या व्हॅल्यू कॅटेगरीमध्ये समाविष्ट असून ग्राहकांना विविध फायदे देतो.
जिओच्या ४४८ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना लोकल आणि एसटीडी कॉलसह अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जाते.
जिओचा ४४८ रुपयांचा रिचार्ज प्लॅन वापरकर्त्यांना ८४ दिवसांच्या कालावधीत एकूण १००० एसएमएस मोफत पाठवण्याची सुविधा देतो.
जिओचा ४४८ रुपयांचा प्रीपेड प्लॅन फक्त कॉलिंग आणि एसएमएस सुविधा पुरवतो, मात्र यात इंटरनेट डेटा अॅक्सेस उपलब्ध नाही.
जिओचा ४४८ रुपयांचा रिचार्ज प्लॅन ग्राहकांना जिओच्या अधिकृत वेबसाइटवर तसेच माय जिओ अॅपमधून सहज उपलब्ध करून दिला जातो.
जिओ अॅप किंवा पोर्टलवर जाऊन प्रीपेड प्लॅन्स सेक्शनमध्ये व्हॅल्यू कॅटेगरी निवडल्यास ग्राहक व्हॉइस ओन्ली रिचार्ज प्लॅन्स शोधू शकतात, ज्यात फक्त कॉलिंग फायदे असतात.
व्हॉइस-ओन्ली श्रेणीत जिओचा आणखी एक रिचार्ज उपलब्ध आहे, ज्याची किंमत ₹१७४८ असून ३३६ दिवसांसाठी कॉलिंग आणि एसएमएस फायदे पुरवतो.