Sakshi Sunil Jadhav
सध्या जिओच्या रिचार्जच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते. पुढे आपण याचा स्वस्त रिचार्ज प्लान जाणून घेऊयात.
सध्या रिलायंस जिओ युजर्ससाठी नवीन प्री-पेड प्लॅन देत आहे. असाच एक प्लॅन ८४ दिवसांसाठी आहे. पुढे आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
सगळ्यात आधी या रिचार्जची गरज कोणाला आहे? हे ओळखणे गरजेचं आहे. ज्या व्यक्तींना कॉलिंग आणि SMS सोबत थोडक्या प्रमाणात नेट असणाऱ्यांसाठी गरजेचे आहे.
कंपनीच्या वेबसाइट आणि myjio अॅप्लिकेशनवर तुम्हाला याचा संपूर्ण प्लान दिसेल. त्यामध्ये सगळ्या सुविधांची नोंद असेल.
799 रुपयांचा हा जिओटा प्लान आहे. त्यामध्ये दिवसाला 1.5 जीबी डेटा मिळेल. म्हणजेच एकूण 126 जीबी या पॅकमध्ये मिळेल.
डेटा व्यतिरिक्त या प्लॅनमध्ये अनलिमीटेड कॉलिंग आणि दररोद १०० SMS देखील मिळतात.
कंपनी यासोबत तुम्हाला जिओ टिव्ही आणि जिओ AI Cludचे सब्सक्रिप्शन सुद्धा मिळेल.
तुम्ही लक्षात घेतले पाहिजे की, जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 5G डेटा मिळणार नाही.