Shraddha Thik
जया किशोरी मोकळेपणाने आपले विचार श्रोत्यांसमोर मांडतात. त्याचप्रमाणे नात्यांवरही त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
जया किशोरी अनेकदा लोकांना नातेसंबंध जपण्यासाठी आणि त्यांना ओळखण्याबाबत सल्ला देतात.
जया किशोरी सांगतात की, नाती खरी आणि खोटी असतात. तुम्हाला कोणत्या नात्याचे समर्थन करायचे आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे.
जया किशोरी सांगतात की, दुःखात प्रत्येकाला देवाची आठवण येते पण सुखात काहीही आठवत नाही.
दुःखात कोणी तुमच्या पाठीशी उभे असेल तरच ते नाते खरे आहे.
त्यांच्या वाईट काळातही बरेच लोक स्वतःच्या चांगुलपणाचा विचार करतात.
वाईट काळात तुमच्या पाठीशी कोण उभं असतं? मित्र असो किंवा नातेवाईक, त्या व्यक्तीकडे पाहूनच तुम्हाला तुमचे खरे नाते ओळखता येईल.