Mumbai : ना माथेरान ना महाबळेश्वर, वीकेंडला करा मुंबईजवळील 'या' स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशनची सफर

Shreya Maskar

मुंबई

तुम्ही जर वीकेंडला १-२ दिवसांसाठी मुंबईजवळ ट्रिप प्लान करत असाल तर जव्हार हिल स्टेशन बेस्ट ऑप्शन आहे.

Mumbai | google

जव्हार हिल स्टेशन

जव्हार हे थंड हवेचे ठिकाण पालघर जिल्ह्यात, मुंबईपासून उत्तरेकडे साधारणपणे १४० ते १५५ किमी आणि नाशिकपासून ८० किमी अंतरावर स्थित आहे.

Jawahar Hill Station | google

पावसाळा

जव्हार हिल स्टेशनला गेल्यावर तुम्हाला स्वर्गाहून सुंदर नजारा पाहायला मिळतो. तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.

rainy season | google

निसर्ग सौंदर्य

जव्हार हे ठिकाण येथील वैशिष्ट्यपूर्ण वारली आदिवासी कला, धबधबे आणि समृद्ध आदिवासी वारशासाठी प्रसिद्ध आहे.

Beauty of nature | google

वारली चित्रे

वारली चित्रे ही एक प्राचीन आदिवासी कलाशैली आहे; यात पारंपारिकपणे झोपड्यांच्या भिंतींवर तांदळाच्या पिठाच्या मिश्रणातून स्थानिक ग्रामीण जीवन आणि विविध विधींचे चित्रण केले जाते.

Warli pictures | google

भव्य धबधबे

जव्हारला 'धबधब्यांचे शहर' असेही म्हटले जाते; येथे ३०० फूट उंच असलेला दाभोसा धबधबा आणि अनेक टप्प्यांतून वाहणारा कलमांडवी धबधबा यांसारखी प्रेक्षणीय स्थळे आहेत.

waterfalls | google

निसर्गरम्य ठिकाणे

'सनसेट पॉइंट' आणि 'हनुमान पॉइंट' यांसारख्या लोकप्रिय ठिकाणांवरून सह्याद्री पर्वत रांगांचे विहंगम दृश्य पाहता येते. नेहमी नेहमी महाबळेश्वर, माथेरानला जाण्यापेक्षा एकदा येथे भेट द्या.

Scenic places | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

Churchgate Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...