Shruti Vilas Kadam
वजन कमी करण्यासाठी जपानी वॉकिंग पद्धत सध्या चर्चेत आहे. यामध्ये संथ आणि वेगाने चालण्याचा समावेश होतो. चालण्याच्या वेगात बदल केल्यामुळे शरीराची सहनशक्ती वाढण्यास मदत होते.
या पद्धतीत ३ मिनिटे हळू ३ मिनिटे वेगाने आणि ३ मिनिटे पुन्हा हळू चालायचे असते. ही प्रक्रिया आपल्या क्षमतेनुसार करावी. सुरुवातीला कमी वेळ चालून हळूहळू वेळ वाढवावा.
वेगाने चालल्यामुळे शरीरातील एनर्जी बर्न होते. नियमित चालणे आणि संतुलित आहार यांमुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
वेगाने आणि संथ चालण्याच्या आलटून-पालटून केलेल्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. नियमित इंटरव्हल वॉकिंगमुळे शरिर हेल्दी राहण्यास मदत होते.
वेगाने चालल्याणे शारीरिक क्षमता आणि चालण्याची सहनशक्ती वाढते. सुरुवातीला दम लागला तरी चालण्याचा वेग आणि कालावधी हळूहळू वाढवता येतो.
नियमित शारीरिक हालचालींमुळे शरीराला रक्तातील ग्लुकोजचा वापर करण्यास मदत होते. त्यामुळे जपानी वॉकिंगसारखा व्यायाम रक्तातील साखरेचे नियंत्रण ठेवते.
नियमित चालण्यामुळे तणाव कमी होण्यास, मन प्रसन्न राहण्यास आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते. सांध्यांचा त्रास असल्यास व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.