Shraddha Thik
जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी असते पण त्यात प्रवास करणे ही वेगळीच गोष्ट आहे. आता या महिन्यात सहलीला जायचे कुठे असा प्रश्न पडतो.
उत्तराखंड हे हिवाळ्यातील ट्रॅव्हेलिंसाठी उत्तम ठिकाण आहे. तुम्ही जानेवारीमध्ये अल्मोडा हे तुमचे डेस्टिनेशन बनू शकते. हिरवळ आणि ढगांनी नटलेले पर्वत असे निसर्गसौंदर्य पाहून कोणीही वेडे होऊ शकते.
ऐतिहासिक किल्ला, राजस्थानी संस्कृती आणि स्थानिक खाद्यपदार्थ पर्यटनासाठी राजस्थानातील पिंक सिटीला सर्वोत्तम पर्यटन शहर मानले जाते.
केरळ हे भारताच्या दक्षिणेस असणारे एक सुंदर पर्यटन ठिकाण आहे. केरळ आपल्यासाठी अनेक प्रकारे विशेष ठरू शकते. येथील उंच पर्वत रांगा, समुद्र किनारे आणि बॅकवॉटर्ससारख्या नैसर्गिक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत.
जानेवारीमध्ये राजस्थानचे हवामान अतिशय थंड असते. हलक्या थंडीत इथे प्रवास करणे ही वेगळी गोष्ट आहे. तुम्ही इथले ब्लू सिटी तुमचे प्रवासाचे ठिकाण बनवू शकता. वाळवंटाच्या काठावर वसलेल्या या शहरात पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत.
पंजाबमधील सुवर्णमंदीरात जाणे एक मन शांत करणारा अनुभव असू शकतो. मनाला शांतता आणि आनंद देणाऱ्या या ठिकाणी अगदी विनामुल्य राहण्याची व्यवस्थाही असते.
कर्नाटकमधील हम्पीदेखील सुट्टीत फिरण्यासाठी एक चांगले पर्यटन स्थळ असू शकते. हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ जुनी स्मारके, मंदिरे यांनी समृद्ध आहे.