Sakshi Sunil Jadhav
जन्नत जुबैर अवघ्या 24 व्या वर्षीच एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील मोठं नाव बनली आहे. लहान वयातच अभिनय, सोशल मीडिया आणि टीव्ही शोजमधून तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.
सध्या जन्नत 'लाफ्टर शेफ 3' या कुकिंग-कॉमेडी शोमध्ये झळकत आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये तिचा मजेशीर अंदाज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये जन्नत आणि कृष्णा अभिषेक यांच्यात पुन्हा एकदा खटके उडाल्याचे पाहायला मिळाले. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड प्रचंड आवडतेय.
जन्नतने थेट कृष्णा अभिषेक यांच्या वडिलांकडे त्यांची तक्रार केल्याचं पाहायला मिळालं. ती म्हणाली की, अंकल, हे आपल्या स्टेशनवर काहीच काम करत नाहीत.
जन्नतने मजेशीर तक्रार करत सांगितलं की, सगळं मसाल्याचं काम तिलाच करायला लावलं गेलं. मिरच्या कापताना तिचे हात जळाले, असंही तिने सांगितलं.
या सगळ्यावर कृष्णा अभिषेकने गंमतीत प्रतिक्रिया दिली. तो म्हणाले की, ''अंकल मनात विचार करत असतील की जन्नत माझी सून झाली तर सासू दिसेन.''
कृष्णा अभिषेक यांच्या वडिलांनीही हसत-हसत यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ''मीही असाच आहे, माझं काम मी दुसऱ्यांकडूनच करून घेतो.''
यावेळी समर्थ जुरेल यांच्या वडिलांनीही टोमणा मारत मजेशीर कमेंट केली. ते म्हणाले, ''यांना काहीच येत नाही, म्हणूनच हे सगळे इथे आले आहेत.''
हा संपूर्ण मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून जन्नतच्या कॉमिक टायमिंगचं आणि शोच्या मजेदार फॉरमॅटचं भरभरून कौतुक केलं जात आहे.