Manasvi Choudhary
आज ४ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण साजरा केला जाणार आहे. घरोघरी बाळकृष्णाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे.
जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्म झाल्यावर त्याची षोडशोपचार पूजा केली जाते आणि त्यानंतर देवाला विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. भगवान श्रीकृष्णाला गोड आणि सात्विक पदार्थ अत्यंत प्रिय आहेत.
बाळकृष्णाला लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवल्याशिवाय जन्माष्टमीची पूजा अपूर्ण मानली जाते. हा कृष्णाचा सर्वात आवडता पदार्थ आहे तो तुम्ही घरी बनवा.
जन्माष्टमीच्या उपवासाला तुम्ही नैवेद्यासाठी धने पावडर आणि गूळ एकत्र करून 'पंजीरी' बनवा यामध्ये सुकामेवा घालून देखील बनवू शकता.
सुंठ, किसलेले खोबरे, पिठीसाखर, चारोळी आणि वेलची पावडर एकत्र करून 'सुंठवडा' तयार करा. जन्माष्टमीच्या दिवशी हा विशेष प्रसाद नैवेद्यासाठी आवर्जून बनवा.
दूध, दही, तूप, मध आणि साखर हे पाच घटक सम प्रमाणात एकत्र करून 'पंचामृत' तयार करा.
अनेक जण जन्माष्टमीला उपवास करतात, त्यामुळे गोड गोड नैवेद्यासाठी साबुदाण्याची खीर, मखाण्याची खीर नैवेद्य बनवू शकता.