Manasvi Choudhary
आज श्री कृष्ण जन्माष्टमी घरोघरी साजरी केली जाणार आहे. या पवित्र सणापूर्वी जर तुम्ही तुमच्या घरी काही विशिष्ट वस्तू आणल्या, तर त्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नांदते
श्री कृष्ण जन्माष्टमीआधी घरी आणायच्या अशा कोणत्या 5 वस्तू आहेत ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
श्रीकृष्ण जन्माष्टमीपूर्वी सुंदर बाळकृष्णाची मूर्ती घरी आणा. नवीन बाळकृष्णाचे घरात आगमन होणे अत्यंत शुभ मानले जाते.
श्रीकृष्णाला बासरी अत्यंत प्रिय आहे. जन्माष्टमीच्या दिवशी एक छोटी बासरी घरी आणून देवघरात ठेवावी. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
श्रीकृष्णाच्या मुकुटाचे मुख्य आणि लाडके भूषण म्हणजे मोरपीस. वास्तूशास्त्रानुसार घरात मोरपीस ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. जन्माष्टमीपूर्वी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा देवघरात एक स्वच्छ मोरपीस ठेवा.
श्रीकृष्णाला प्रिय असणारी 'गाय आणि वासराची' छोटी मूर्ती घरी आणा.
माता लक्ष्मी आणि श्रीकृष्णाला कमळाचे फूल अतिशय प्रिय आहे. जन्माष्टमीच्या पूजेसाठी कमळाचे फूल घरी आणा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.