Manasvi Choudhary
यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी १६ तारखेला सर्वत्र साजरी होणार आहे.
श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्म झाला.
कृष्णजन्माष्टमी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.
कृष्णजन्माष्टमीला घरच्या घरी लोणी करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
एका भांड्यात दूध मध्यम आचेवर उकळून घ्या. आणि थंड करा.
एका लहान भांड्यात दुधावर तयार होणारा मलईचा थर गोळा करा.
मलईमध्ये थोडे दही घालून ५ ते ६ तास हे मिश्रण बाजूला ठेवून द्या.
आता मलईचा दही तयार होईल. मिश्रणात बर्फाचे थंड पाणी घाला आणि जोपर्यंत लोणी पाण्यापासून वेगळे होत नाही तोपर्यत ढवळून घ्या.
असे केल्याने लोणीचा तवंग पाण्यावर येतो. हा तवंग काढून साठवून ठेवा.