Siddhi Hande
अभिनेत्री तेजश्री प्रधानला अजूनही तिच्या होणार सून मी या घरची या मालिकेमुळे ओळखले जाते.
तेजश्री प्रधानचे या मालिकेत जान्हवी नावाचे पात्र साकारले होते.
तेजश्रीचे या मालिकेतील मंगळसूत्र खूप महिलांना आवडले होते.या मंगळसूत्राचा अजूनही ट्रेंड आहे.
जान्हवीचे तीन पदरी मंगळसूत्र खूप लोकप्रिय झाले होते. त्याच्या अनेक डिझाइनदेखील बाजारात उपलब्ध झाल्या होत्या.
जान्हवीच्या या मंगळसूत्रात तीन पदरात काळे मणी आणि सोन्याची गुंफण होती. त्यात मध्ये तिन्ही पदरात सोन्याचा मोठा मणी होता.
एकाच सोन्याच्या चैनीत हे मंगळसूत्राचे हे तिन्ही पदर गुंफले होते.
या मंगळसूत्राला एक वेगळाच लूक आहे. या मंगळसूत्रात अजून अनेक डिझाइनदेखील पाहायला मिळतात.
आजही अनेक महिलांच्या मनात मंगळसूत्र पाहायला मिळतात.
अभिनेत्री तेजश्री प्रधाननेही अजूनही हे मंगळसूत्र जपून ठेवले आहे.