Manasvi Choudhary
ग्लॅमरच्या दुनियेत आपल्या सौंदर्याने चार चाँद लावणारी अभिनेत्री म्हणजे जान्हवी कपूर.
जान्हवी कपूर अभिनयासह तिच्या स्टायलिश अंदाजामुळे लाईमलाईटमध्ये राहते.
हल्लीच जान्हवी इंडिया कॉउचर वीक 2025 च्या रॅम्प वॉकवर चमकताना दिसली.
जान्हवीने यादरम्यानचे तिचे फोटो सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
जान्हवीने पेस्टल कलरचा भरजरी लेहेंगा परिधान केलाय यामध्ये तिचं सौंदर्य खुललं आहे.
या लेहेंगा लूकवर तिने खास स्वीटहार्ट नेकलाईन ब्लाऊज पॅटर्न परिधान केला आहे.
मिनिमल मेकअपसह जान्हवीने हेअरस्टाईल असा लूक केला आहे.