Shruti Vilas Kadam
एका भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोअर आणि थोडे दही घेऊन त्यात पाणी घालत गुळगुळीत पीठ तयार करा.
तयार पीठ झाकून काही तास ठेवा. यामुळे जलेबीला छान टेक्सचर मिळण्यास मदत होते.
कढईत साखर आणि पाणी घेऊन एकतारी पाक तयार करा. त्यात वेलची किंवा केशर घातल्यास चव आणि सुगंध वाढतो.
तयार पीठ सॉसच्या बाटलीत किंवा जिलेबी बनवण्याच्या कपड्यात भरा. गरम तेलात गोलाकार पिळून जिलेबीचे आकार द्या.
जिलेबी दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तेलाचे तापमान योग्य ठेवणे महत्त्वाचे आहे.
तळलेल्या गरम जिलेबी लगेच तयार साखरेच्या कोमट पाकात ३० सेकंद ते १ मिनिट बुडवून काढा.
तयार जिलेबी गरमागरम सर्व्ह करा. रबडीसोबत खाल्ल्यास तिची चव आणखी स्वादिष्ट लागते.