Shruti Vilas Kadam
बेसन, अजवाइन, हिंग, मीठ, तेल आणि पाणी यांचा वापर करून फाफडा तयार केला जातो.
बेसनामध्ये तेल, हिंग आणि मीठ टाकून थोडं थोडं पाणी घालून मऊसर पण चिकटसर पीठ मळा आणि झाकून ठेवा.
छोट्या गोळ्यांचे लांबट फाफडे करून गरम तेलात कुरकुरीत तळून घ्यावे.
मैदा, कॉर्नफ्लोर, दही, पाणी, केशर, साखर, लिंबू रस आणि तेल गरजेचे असते.
जलेबीसाठीचं पीठ काही तास आंबवून घ्यावं आणि साखरेचा एकतारी पाक तयार करावा.
पीठ गोळ्यातून गरम तेलात गोल फिरवत टाकून जलेबी कुरकुरीत तळावी आणि तयार पाकात १-२ मिनिटे भिजवावी.
गरमागरम फाफडा जलेबीसोबत तळलेली मिरचीसह सर्व्ह करा खास गुजराती स्टाईल!