Saam Tv
बऱ्याच घरांमध्ये साखरेचा वापर जास्त प्रमाणात असतो.
पण साखर आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे की गुळ? हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतो.
साखरेपेक्षा गुळ हा आरोग्यदायी पर्याय आहे, पण त्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे आवश्यक आहे.
साखरेच्या तुलनेत गुळ पौष्टिक असतो.
गुळात लोह, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, व्हिटॅमिन- B, अँटिऑक्सिडंट्स अशी अनेक आवश्यक पोषकतत्वे असतात.
गुळ हा पारंपारिक नैसर्गिक गोड पदार्थ आहे.
त्यामुळे आयुर्वेदानेही साखरेपेक्षा गूळ हा श्रेष्ठ मानला आहे.
मधुमेहाच्या रुग्णांनी साखरेऐवजी गूळ घेण्यापूर्वी काळजी घ्यावी. जर तुम्ही ते जास्त प्रमाणात घेतले तर तुम्ही कॅलरीजचे प्रमाण वाढवत आहात.